होम ई-पेपर
सर्व बातम्यांकडे परत
होम / क्रीडा
क्रीडा

सासवडमध्ये तीन मेडिकल दुकानांना चोरट्यांचा डल्ला; ९६ हजारांचा ऐवज लंपास

सासवड प्रतिनिधी दि. २८ सासवड शहरातील भोंडेनगर, जेजुरी नाका आणि एस.टी. स्टँड परिसरातील तीन मेडिकल दुकानांना अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानांची लोखंडी शटर उचकटून नुकसान करत चोरट्यांनी रोख रक्कम, लॅपटॉप, प्रिंटर व कॉस्मेटिक्स असा सुमारे ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला, तर तीनही दुकानांच्या शटर व फर्निचरचे मिळून सुमारे १४ हजार रुपयांचे नुकसान केले. या घटनेमुळे सासवड शहरातील व्यापारी व दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Admin By Admin 🕒 28 Aug 2026 • 14:28 आपला बळीराजा
सासवडमध्ये तीन मेडिकल दुकानांना चोरट्यांचा डल्ला; ९६ हजारांचा ऐवज लंपास
सासवड प्रतिनिधी दि. २८ सासवड शहरातील भोंडेनगर, जेजुरी नाका आणि एस.टी. स्टँड परिसरातील तीन मेडिकल दुकानांना अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानांची लोखंडी शटर उचकटून नुकसान करत चोरट्यांनी रोख रक्कम, लॅपटॉप, प्रिंटर व कॉस्मेटिक्स असा सुमारे ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला, तर तीनही दुकानांच्या शटर व फर्निचरचे मिळून सुमारे १४ हजार रुपयांचे नुकसान केले. या घटनेमुळे सासवड शहरातील व्यापारी व दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सासवड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध संतोष महादेव कामठे यांच्या कडुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सासवड शहरातील मेडिकल दुकानांना लक्ष्य केले. भोंडेनगर येथील संतोष महादेव कामठे यांच्या मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील १५ हजार रुपयांची रोख रक्कम, १५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा लॅपटॉप, १० हजार रुपयांचा कॅनॉन कंपनीचा प्रिंटर आणि ३५ हजार रुपये किमतीचे कॉस्मेटिक्स असा एकूण ७५ हजार रुपयांचा माल चोरून नेला. याशिवाय दुकानाच्या शटरचे सुमारे ७ हजार रुपयांचे नुकसान केले. यानंतर चोरट्यांनी जेजुरी नाका येथील सागर मेडिकल या दुकानालाही लक्ष्य केले. दुकानाचे लोखंडी शटर व आतील फर्निचरचे सुमारे ७ हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. तसेच एस.टी. स्टँडजवळील प्रिशा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून सुमारे ७ हजार रुपयांचे नुकसान केले. अशा प्रकारे चोरी गेलेला माल व तीन मेडिकल दुकानांच्या नुकसानीची एकूण किंमत ९६ हजार रुपये असल्याचे पोलिसांत नोंद करण्यात आले आहे. एकाच रात्री शहरातील तीन मेडिकल दुकानांना लक्ष्य केल्याने या चोरीमागे सराईत चोरट्यांचा हात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तसेच रात्रीच्या वेळी शहरातील व्यावसायिक भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. राऊत करीत असून, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
!