राजकीय
भांडगावला एसटी बसगाड्यांचा अधिकृत थांबा; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत
दौंड प्रतिनिधी ता.२८ पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना अधिकृत थांबा मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाचे स्वागत गुरुवारी (दि. १३) सकाळी १०.३० वाजता पुणे-करमाळा बसगाडीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करून करण्यात आले.
दौंड प्रतिनिधी ता.२८
पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना अधिकृत थांबा मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाचे स्वागत गुरुवारी (दि. १३) सकाळी १०.३० वाजता पुणे-करमाळा बसगाडीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करून करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भांडगाव येथे पुणे-सोलापूर महामार्गावरून ये-जा करणाऱ्या राज्यातील सर्व आगारांच्या बसगाड्यांना थांबा देण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर प्रथमच पुण्याहून करमाळ्याकडे जाणारी बस भांडगाव येथे थांबविण्यात आली.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने दौंड आगाराचे वाहतूक निरीक्षक प्रतीक अनाके, अनिल भागवत तसेच बसचे चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. बसमधील प्रत्येक प्रवाशाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. बसच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळीही काढण्यात आली होती.
भांडगाव येथे प्रथमच एसटी बसगाडी अधिकृतपणे थांबल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या थांब्यामुळे खोर, भांडगाव, खुटबाव आणि गलांडवाडी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, पुणे, दौंड, सोलापूर तसेच अन्य ठिकाणी प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा अधिक सुलभ होणार आहे.
पुणे जिल्हा शिवसेना शेतकरी सेना अध्यक्ष रामदास दोरगे विजय शेंडगे अमित दोरगे दत्तात्रय बोरकर प्रमोद दोरगे नितीन जालिंदर दोरगे जयदेव दोरगे प्रकाश बोरकर सुनील हरपळे संदीप दोरगे, मा.सभापती रामचंद्र चौधरी,शंकर शितोळे स्वप्निल खांदवे,माजी सरपंच शीलाताई गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.