अपराध
१९ घरफोडी मधील दोन वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; दौंड प्रतिनिधी दि.२८ दौंड, यवत व उरुळी कांचन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडीच्या तब्बल १९ गुन्ह्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेतले. हनुमंत बंडू उर्फ फोट्या काळे (वय अंदाजे ४०, रा. राक्षसवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी;
दौंड प्रतिनिधी दि.२८
दौंड, यवत व उरुळी कांचन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडीच्या तब्बल १९ गुन्ह्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेतले. हनुमंत बंडू उर्फ फोट्या काळे (वय अंदाजे ४०, रा. राक्षसवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये फरार होता. त्याचे इतर साथीदार पोलिसांच्या हाती लागल्यानंतर तो मूळ गावी राक्षसवाडी येथे राहत नव्हता. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी नाव बदलून वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
दरम्यान, आरोपी हनुमंत काळे हा शिक्रापूर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपीला शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत, सहायक पोलीस फौजदार सचिन घाडगे, सहायक पोलीस फौजदार आसिफ शेख, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड आणि सुभाष राऊत यांनी करावाई केली.